मोबाईल फोन्सच्या स्पर्धेच्या जंजाळात ग्राहकांना 'अच्छे दिन'!

शियोमी, आसुसु, मोटोरोला, ओबी यांसारखे मोबाईल फोन ब्रान्डद्वारे भारतात आपली भागिदारी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना 'अच्छे दिन' मिळणार आहेत.

Updated: Feb 20, 2015, 02:46 PM IST
मोबाईल फोन्सच्या स्पर्धेच्या जंजाळात ग्राहकांना 'अच्छे दिन'! title=

नवी दिल्ली : शियोमी, आसुसु, मोटोरोला, ओबी यांसारखे मोबाईल फोन ब्रान्डद्वारे भारतात आपली भागिदारी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना 'अच्छे दिन' मिळणार आहेत.

यंदाच्या वर्षांत वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांद्वारे 1400 ते 1500 नवे मॉडेल सादर केले जाऊ शकतील. '91 मोबाईल डॉट कॉम'च्या अहवालात म्हटलं गेलंय. 

'2015 मध्ये मोबाईल फोनचे जवळपास 1400 ते 1500 मॉडल बाजारात सादर होतील, अशी शक्यता आहे. 2014 च्या मानाने ही संख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे' असं या अहवालात म्हटलं गेलंय. गेल्या वर्षात एकूण 1137 मोबाईल फोन बाजारात सादर करण्यात आले होते. तर 2013 मध्ये ही संख्या 957 होती.

मोबाईल फोन आणि इतर गॅझेटसंबंधी तुलनात्मक माहिती आणि संशोधनात्मक माहिती सादर करणाऱ्या '91 मोबाईल डॉट कॉम' या वेबसाईटकडे 20,000 हून अधिका उपकरणांचा डेटाबेस आहे. 

2013 आणि 2014 मध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची ओढ महागड्या उपकरणांकडे असल्याचं दिसून आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.