मोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ?

आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.

Updated: Jun 2, 2016, 09:10 PM IST
मोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ? title=

मुंबई : आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.

१. सिक्यूरिटी पासवर्ड : तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सिक्युरीटी पासवर्ड ठेवली का नाही. कारण तुम्ही जर तसं करत नसाल तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी तुमचे प्राईवेट फोटो आणि इतर गोष्टी लोकं पाहतील. त्यामुळे पासवर्ड जरुर ठेवा.

२. फ्री वाय-फाय - जर तुम्ही फ्री वायफाय वापरत असाल तर त्यासोबत तुमच्या मोबाईलसाठी रिस्क देखील वाढते. हॅकर तुमचा डेटा चोरू शकता. त्यामुळे कोणताही अनोळखी वायफाय वापरु नका.

३. स्मार्टफोन साफ करा - स्मार्टफोनमध्ये एका टॉयलेटसीट पेक्षा अधिक जंतू असू शकता. त्यामुळे स्मार्टफोन वेळोवेळी साफ करा. यासाठी तुम्ही अँटी बॅक्टेरिअल सोल्यूशन वापरु शकता.

४. स्मार्टफोन अधिक चार्ज करणे - स्मार्टफोन गरजेपेक्षा अधिक चार्ज केल्याने बॅटरी लवकर खराब होते. फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका.

५. अँटी व्हायरस - तुमचा फोन देखील एका छोट्या स्मार्टफोनप्रमाणेच आहे. कंप्युटरप्रमाणे स्मार्टफोनलाही अँटी व्हायरसची गरज असते. त्यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहतो.

६. अँटी थेफ्ट अॅप्स - फोन कधीही चोरु होऊ शकतो. त्यामुळे फोन चोरी झाल्यानंतर तुमचा डेटा कोणाच्या हाती लागू नये म्हणून अँटी थेप्ट अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या. त्यामुळे मोबाईल चोरी झाल्यानंतर तुमचा डेटा डिलीट होण्यासाठी हा अॅप जरुर ठेवा.

७. सॉफ्टवेअर अपडेट - सॉफ्टवेअर अपडेट तुमच्या फोनचं फंक्शन अधिक चांगलं करते. त्यामुळे अपडेट राहणं अधिक चांगलं.

८. कोणतंही अॅप इंस्टॉल करणं - अनेकदा कोणतंही अॅप आपण सहज इंस्टॉल करुन टाकतो. फोनमध्ये चांगले अॅप गरजेचे आहे पण कोणतंही अॅप इंस्टॉल करण्यापूर्वी त्याचं प्रोडक्ट रेटींग आणि रिव्ह्यू नक्की पाहा.

९. लिंकवर क्लिक - जर तुम्हाला कोणीही कोणतीही लिंक पाठवत असेल तर त्यावर क्लिक करु नका. यामुळे तुमच्या फोनच्या अडचणी वाढतात. अनेकदा या लिंक ओपन करतांना तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस येऊ शकतो. अनेक फसवणाऱ्या लिंकपासून सावध राहा.

१०. ब्लूटूथ ऑन - फोनमधील ब्लूटूथ नेहमी सुरु असणं योग्य नाही, यामुळे तुमची बॅटरी लवकर संपते किंवा हॅकर याचा फायदा घेऊ शकता. ते तुमचा मोबाईल अॅक्सेस करु शकता.  ब्लूटूथ कनेक्शनची रेंज १० मीटरपर्यंत असते. त्यामुळे कोणीही तुमच्या मोबाईला अक्सेस करु शकतं.