नवखी ‘आई’ करते फेसबूकचा सर्वाधिक वापर

गरोदर मातांना डोहाळे लागतात हे तरं सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपल्या चिमुकल्याला जन्म दिल्यानंतरही मातांना डोहाळे लागतात... तेही फेसबूकचे...

Updated: Jun 7, 2012, 06:20 PM IST

 www.24taas.com, लंडन  

 

गरोदर मातांना डोहाळे लागतात हे तरं सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपल्या चिमुकल्याला जन्म दिल्यानंतरही मातांना डोहाळे लागतात... तेही फेसबूकचे... 

 

होय, असं म्हटलंय लंडनच्या डेली टेलीग्राफनं. डेली टेलीग्राफच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतल्या ओहयो स्टेट युनिव्हर्सिटीतल्या काही संशोधनकर्त्यांनी या अभ्यासासाठी १५४ माता आणि १५० पित्यांच्या सवयींचा अभ्यास केलाय. या अभ्यासामध्ये, आई झाल्यानंतर लगेचच अनेक महिला फेसबूकचा वापर जोमाने करत असल्याचं या संशोधनकर्त्यांच्या आढळून आलं. पण, हा बदल त्यांना फक्त महिलांतच जाणवला. बाप झाल्यानंतर पुरुषांमध्ये असा कोणताही बदल झाला नव्हता. त्यांचा फेसबूकचा वापर तसाच होता, जसा अगोदर...

 

याच्या कारणांचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की, तणावग्रस्त स्थितीत असताना महिला फेसबूकचा वापर सर्वाधिक करत होत्या. कदाचित त्या आपल्या ऑनलाईन मित्रांच्या घोळक्यात स्वत:साठी आधार शोधत असाव्यात, असा अंदाज या संशोधनकर्त्यांनी व्यक्त केलाय. या अभ्यासात त्यांना जाणवलं की, १० मधल्या ९ माता म्हणजेच जवळजवळ ९३ टक्के मातांनी आपल्या बाळाचा फोटो शेअर करण्यासाठी प्रथम फेसबूकचा वापर केला. तेव्हाच पित्यांचा हा आकडा मातांएवढा नसला तरी तो ८३ टक्के  इतका होता. 

 

.