रजोनिवृत्तीवर उपाय... योगासनांचा अभ्यास!

रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2014, 07:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.
स्त्रियांच्या जीवनातील वयाच्या एका टप्प्यानंतर मासिकपाळी बंद होण्याच्या काळात अनेक स्त्रियांना, रात्री गरम आणि थंड घाम येणे, वजन वाढणे आणि पुरळ येणे या समस्या सतावतात. पण, या समस्येवर उपाय म्हणून १२ आठवडे योगासनाचं प्रशिक्षण घेऊन घरी नियमीत योगासन करणं महत्त्वाचं ठरतं. योगासनांमुळे निद्रानाशाच्या समस्येवर मात करता येऊ शकते, असा निष्कर्ष संशोधनकत्यांनी काढलाय.
शोधनिबंधाच्या मुख्य लेखिका आणि अमेरिका ग्रुप हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ संशोधक कैथरीन न्यूटन यांनी सांगितलंय की, स्त्रियांना रात्री गरम आणि थंड घाम येणे, वजन वाढणे आणि पुरळ येणे या समस्या हार्मोन थेरपीने दूर करता येतं. परंतु, अलीकडे फार कमी स्त्रिया हार्मोन थेरपी करून घेतात.
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या या समस्या योगासने, व्यायाम, माशाचे तेल यापैकी काय प्रभावी औषध आहे, हे शोधणं या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. आणि यापैकी योगासनेच प्रभावी उपाय असल्याचे लक्षात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.