मुंबई : उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना आपण पावसाची नेहमीचं आतुरतेने वाट पहात असतो.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच पावसात भिजायला आवडते.
पण हाच पाऊस व्यक्तीचं सौंदर्य खुलवण्यासाठीही तितकाच उपयुक्त आहे.
रोज या पावसाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास हे पाणी टॉनिकसारखे कार्य करून चेहरा अजून जास्त खुलवते. आणि त्य़ावर एक प्रकारचा तजेला आणते.
पावसाचे पाणी गाळून रोज त्याने हात, पाय तसेच चेहरा धुतल्यास त्वचा अगदी नरम राहते.
शिवाय त्वचेच्या सुरक्षेसाठी मोहरीच्या दाण्यांना थोडं भाजून ते कच्च्या दुधात वाटून घ्या आणि ते संपूर्ण शरिराला लावा. यामुळे आपली त्वचा अजून सुंदर दिसू लागेल.
मुलतानी माती रात्रभर पावसाच्या पाण्यात भिजवून सकाळी १० ते १५ मिनिटांकरीता चेहऱ्याला लावून ठेवा. यामुळे मुरुमांपासून कायमची मुक्ती मिळेल. अशाप्रकारे पावसात पाण्याने सौंदर्य वाढवता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.