भारतातील स्त्रियांना अजुनही धुम्रपान 'कूल' वाटतंय?

भारतात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट झालीय, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. पण, थांबा... कारण, भारतातील धुम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या मात्र जवळजवळ ‘जैसे थे’ परिस्थीतीत आहे, हे ऐकून नक्कीच तुमचा आनंद मावळेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2014, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट झालीय, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. पण, थांबा... कारण, भारतातील धुम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या मात्र जवळजवळ ‘जैसे थे’ परिस्थीतीत आहे, हे ऐकून नक्कीच तुमचा आनंद मावळेल.
दररोज नियमितपणे धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत गेल्या सलग तीन दशकांत कमालीची घटल्याचं दिसतंय. परंतु, लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेता भारतातील धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही केवळ अमेरिकेपेक्षा कमी आहे. परंतु ही संख्या इतर देशांच्या प्रमाणात कित्येक पटींनी जास्त आहे.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड इव्हॅल्युएशन’नं (IHME) नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणात ही बाब उघड झालीय. या सर्व्हेक्षणाप्रमाणे भारतातील धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट झालीय. ही संख्या १९८० साली ३३.८ टक्के होती ती २०१२ साली २३ टक्क्यांवर आलीय. तर धुम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या २०१२ साली ३.२ टक्के असल्याचं आढळलंय. ही संख्या १९८० सालीही जवळजवळ इतकीच होती.
या सर्वेक्षणासाठी २०१२ साली १२.१ दशलक्ष महिलांच्या आणि ९८ दशलक्ष पुरुषांच्या सवयींचा अभ्यास केला गेला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.