लठ्ठपणा वाढण्याचे सहा कारणं, हे उपाय करा!

महिला असो किंवा पुरुष आपल्या लठ्ठपणामुळं हैराण असतात. या लठ्ठपणामागे अनेक कारणं असतात. आपलं खाणं-पिणं, राहणं यांचा सतत परिणाम आपल्या लठ्ठपणावर होतो. त्यामुळं आपल्या सौंदर्यावर तर परिणाम होतोच शिवाय आरोग्यही धोक्यात येतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 15, 2014, 11:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महिला असो किंवा पुरुष आपल्या लठ्ठपणामुळं हैराण असतात. या लठ्ठपणामागे अनेक कारणं असतात. आपलं खाणं-पिणं, राहणं यांचा सतत परिणाम आपल्या लठ्ठपणावर होतो. त्यामुळं आपल्या सौंदर्यावर तर परिणाम होतोच शिवाय आरोग्यही धोक्यात येतं.
पाहा कोणत्या कारणांनी वाढतो लठ्ठपणा
1) दररोज कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणं
जर आपण दररोज सोडा पित असाल तर सावधान, कारण त्याच्या सेवनानं लठ्ठपणा वाढू शकतो. संशोधनकर्त्यांनुसार दररोज सोडा पिल्यानं लठ्ठपणा जोमानं वाढतो. तर आठवड्यात एक वेळा सोडा पिल्यानं प्रकृतीवर जास्त परिणाम होत नाही.
खूप जणांना वाटतं की डायट सोड्यात कमी कॅलरीज असतात. मात्र या कॅलरीजसुद्धा प्रकृतीसाठी हानिकारक असतात. त्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं म्हणून जेवतांना सोडा पिणं टाळावं. जर तुम्हाला जेवतांना काही ड्रिंग प्यायचंच असेल तर फळांचा ज्यूस प्या.
2) जास्त फॅट्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं...
लठ्ठपणासाठी सर्वात जास्त जबाबदार खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. जर तुम्ही बेसुमार मिष्ठान्न, तुप, फास्टफुड खात असेल तर लठ्ठुणाला सामोरं जावं लागेल.
आपल्या आहारात जास्त फॅट्सयुक्त पदार्थ नसावे, याची काळजी तुम्हालांच घ्यायचीय. कारण त्यात कॅलरीची संख्या खूप कमी असते. त्यामुळं ते टाळल्यानं शरीर स्वस्थ आणि लठ्ठपणा विहरहित राहील. जेवणार ऑलिव्ह ऑर्लचा वापर करावा.
3) रात्री उशीरा जेवण करणं आणि लगेच झोपणं...
हे खरंय की जेव्हा आपण झोपता, तेव्हा नॅचरली आपल्या शरीरातून चरबी कमी होते. मात्र पोटभर जेवून झोपल्यानं असं घडू शकत नाही.
अनेक जण रात्री खूप उशीरानं जेवतात, ज्यामुळं त्यांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. सोबतच लठ्ठपणा ही समस्याही निर्माण होते. जर तुम्ही योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल.
सोबतच रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत. याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोपू नये. कारण असं केल्यानं जेवण पचत नाही. आपल्या जेवणाऱ्या आणि झोपण्याच्यामध्ये कमीत कमी तीन तासांचं अंतर असावं.
4) जेवणासाठी मोठं ताट वापरणं...
जेव्हा आपण घरी किंवा बाहेर जेवता तेव्हा जेवतांना आपल्या ताटाच्या आकाराकडे विशेष लक्ष द्यावं. एका सर्व्हेनुसार जे लोक जेवणासाठी मोठं ताट घेतात, त्यात भरपूर पदार्थ वाढून घेतात. त्यामुळं आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त जेवण जेवल्या जातं. जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नेहमी छोट्या प्लेटमध्येच जेवा. यामुळं तुम्ही तुमची ओव्हर इटिंगची सवय बंद करू शकाल.
5) क्रोध आणि तणावात असतांना अधिक जेवणं करणं...
आपण नेहमी बघितलं असेल की जेव्हा आपल्या खूप क्रोध येतो किंवा आपण तणावात असाल तर तुम्ही जास्त जेवू लागता. त्यावेळी जेवण चांगलं तर लागत नाही मात्र मनाला शांत करण्यासाठी आणि आणखी काही विचार करण्यासाठी तुम्ही खूप जेवता. त्यामुळं हळुहळु चरबी जमा होत जाते.
क्रोध आणि तणाव असतांना जास्त जेवण करणं टाळायचं असेल तर पाणी प्या. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारा आणि आराम करा. त्याशिवाय इतर कोणत्याही एक्टिव्हिटी आपण करू शकता. ज्यामुळं तुम्ही भावूक असतांना एक्स्ट्रा कॅलरीज घेण्यापासून वाचू शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.