एक कप कॉफी डोळ्यांसाठी लाभदायक

तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 8, 2014, 07:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.
आहात विशेषज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज एक कप कॉफीचं सेवन केल्यानं तुमची नजर अंधुक होण्यापासून किंवा मोतीबिंदू किंवा वयस्करपणात वयामुळे – मधुमेहामुळे रेटिनाला हानी पोहचण्यापासून वाचवतो. या समस्यांमुळे व्यक्तीला अंधपणा येण्याची शक्यता असते.
कोरनेल विश्वविद्यालयाचे आहार विज्ञानाचे प्रोफेसर चांग वाई ली यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या कॉफीत जवळजवळ एक टक्का कॅफीनचा असतो आणि 7 ते 9 ट्कके प्रमाण क्लोरोजेनिकल आम्लाचं असतं. हेच क्लोरोजेनिकल आम्ल रेटिनाला हानी पोहचविण्यापासून वाचविण्यासाठी एक चांगलं अँन्टीऑक्सिडेंट असतं.
ली यांच्या म्हणण्यानुसार, कॉफी जगभरात सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे आणि ती स्वास्थ्यासाठीही उपयोगी ठरते, हे माहीत पडल्यावर सगळ्यांनाच आनंद होणार आहे.
ली यांच्या म्हणण्यानुसार, हा अभ्यास कार्यात्मक खाद्य पदार्थांचे गुणधर्म समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण, हे खाद्यपदार्थ स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरतात.
याआधीच्या अभ्यासांमधून, कॉफीचं सेवन केल्यानं प्रोटेस्ट कँसर, मधुमेह, अल्जायमर आणि वाढत्या वयातील निर्माण होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो, असंही आढळलं होतं. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँन्ड फूड केमिस्ट्री’ प्रकाशित झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.