www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.
दोन्ही हातांची बोटं एका विशिष्ट दबावानं एकत्रित आणून अशाप्रकारे टाळी वाजवायची की हातांच्या प्रत्येक बिंदूवर दबाव पडेल आणि आवाजही चांगली येईल. अशाप्रकारं टाळी वाजवल्यास डाव्या हातावर असलेले आतडे,यकृत, पित्त मूत्राशय, मूत्रपिंड, लहान आणि मोठे आतडे, नाकाशी संबंधित तसंच उजव्या हातावरील बिंदू दाबले जातात. त्यामुळं रक्तप्रवाहही तीव्र होतो. जोपर्यंत हात लाल होत नाही तोपर्यंत टाळी वाजवली गेली पाहिजे. अशाप्रकारं टाळी वाजवल्यास बध्दकोष्ठ, ऍसिडीटी, मूत्रमार्गातील संक्रमण, रक्तातील कमतरता, श्वास घेण्यात होत असलेल्या त्रास हे कमी होतात.
टाळी वाजवतांना दोन्ही हातांची बोटं म्हणजे अंगठ्याशी अंगठा, करंगळीसोबत करंगळी अशाप्रकारं सर्व बोटं एकमेकांवर पडायला हवी आणि तळवा तळव्यावर. या टाळीचा आवाज खूप मोठा येतो आणि दूरपर्यंत जावू शकतो. पाठ, कान, डोळे, खांदा आणि मेंदूवरही टाळीचा ताण पडतो. टाळीचा सर्वाधिक लाभ निद्रानाश, स्लीप डिस्क, नैराश्य, कामचुकारपणा, डोळ्यांचा अशक्तपणाला होतो. अॅक्युप्रेशर डॉक्टर सांगतात की टाळी हाथ अगदी लाल होईपर्यंत वाजवावी.
आरती करतांना आपण जशी टाळी वाजवतो. तशी टाळी म्हणजेच क्रॉस स्वरूपात टाळी वाजवल्यास त्याचा विशेष रोगांबाबत फायदा होत नसला तरी त्या टाळीनं आपल्याला प्रेरणा आणि उत्साह मिळतो. अशी टाळी वाजवल्यानं इतर अवयवांमधील बिंदू सक्रिय होतात आणि त्यामुळं शरीर ताजंतवानं होण्यासही मदत मिळते. खूप वेळ अशी टाळी वाजवल्यास घाम येतो ज्यामुळं शरीरातले विषारी तत्त्व घामाद्वारं बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळते. म्हणूनच टाळी वाजवा आणि रोगांचा पळवा!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.