b>www.24taas.com,बर्लिन
दारू सेवन करणाऱ्या पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात अधिक वाढ झालीय. जर्मनीतील संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की सामान्य महिलांच्या तुलनेत मद्यपान करणाऱ्या महिलांचं प्रमाण ४६० टक्के अधिक झालयं, याउलट दारू सेवन करणाऱ्या पुरूषांचे प्रमाण सामान्य पुरूषांच्या तुलनेत १९० टक्क्यांइतकचं आहे.
युर्व्हसिटी ऑफ ग्रिफ्सवॉल्डमध्ये इपिडीमिओलॉजी आणि सोशल मेडिसिनचे प्राध्यापक अॅलरिच जॉन यांनी माहिती दिली की, मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामान्य वयाच्या व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. जॉन आणि त्यांच्या सहकार्यांनी वयवर्षे १८ पासून ते ६४ वयापर्यंतच्या ४,०७० व्यक्तींची उदाहरणे गोळा केली होती. ज्यात १५३ माणसं मद्यपान करायचे आणि १४९ माणसं (११९ पुरूष, ३० महिला) १४ वर्षापासून दारूचे सेवन करत होते.
जॉन यांचं असं म्हणणं आहे कि संशोधन करताना संशोधकांनी कम्पोझिट डायग्नोस्टिक(सीआईडीआई) चा वापर केला आहे जो आंतरराष्ट्रीय आणि व्यापकदृष्ट्र्या मान्य साधन आहे.