www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या दहा वर्षांत तब्बल ७९३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. खुद्द आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच ही माहिती दिलीये.
राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये दर महिन्याला सरासरी सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. आदिवासी विकास विभागाच्याच २००१ पासूनच्या आकडेवारीत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या दहा वर्षांत तब्बल ७९३ विद्यार्थी विविध कारणांनी दगावले आहेत.
खुद्द आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच ही माहिती दिलीये. धक्कादायक बाब म्हणजे विधान परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात आदिवासी विकास विभागानं कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यावरच समाधान मानलंय... मात्र हे मृत्यू रोखण्यासाठी काहीही कारवाई होताना दिसत नाहीये.
राज्यात २९ प्रकल्प कार्यालया अंतर्गत १, १०३ आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये ३ लाख ९८ हजार ९० विद्यार्थी आहेत. अनेक आश्रमशाळांना पक्की इमारतच नाही. कुडाच्या भिंतीआड शाळा सुरू आहेत. ज्या खोलीत रहायचं त्याच खोलीत वर्ग भरतात. आरोग्य सुविधांआभावी विद्यार्थी आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. साप आणि विंचू दंशामुळे अनेक विद्यार्थी दगावतात. त्यातच निकृष्ट दर्जाचं अन्न आणि कुपोषण हीदेखील मोठी समस्या आहे. विशेष म्हणजे आत्महत्या, आजारपण, नैसर्गिक मृत्यू ही देखील कारण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ