www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अटीतटीची लढतीच छत्तीसगडमध्ये अखेर ‘चावलवाले बाबा’ विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांचेच सरकार पुन्हा आले आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने ४९ जागा जिंकल्या असून काँग्रेस ३९ जागांवरच विजय मिळवू शकला. ९० जागांच्या छत्तीसगड विधानसभेमध्ये बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता होती. बहुजन समाज पक्षाने एक जागा जिंकली आहे, तर एका जागेवरून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे छत्तीसगडमध्येही रमणसिंह यांचे भाजपचे सरकार 'हॅटट्रिक' केली आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच छत्तीसगडमधील निकालाचे पारडे दोन्हीकडे झुकत होते.
मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढवली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर याठिकाणी पुन्हा रमण सिंह यांचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. ते खरे ठरले आहे.
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी घडविलेल्या हल्ल्यात या राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची हत्या झाली होती. त्यामुळे या भागात काँग्रेसला सहानुभुती मिळून सत्ता मिळेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही.
काय झाले आज
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता खेचून आणली आहे. या आधीच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. तर मध्य प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत राहण्याचा मान भाजपने पटकावला आहे.
या निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. मोदींना या निवडणुकांचे श्रेय देण्यात येत आहे. चार राज्यांमध्ये भाजप सत्तेजवळ असल्याने भाजपच्या गोठात जल्लोष आहे. तर काँग्रेसमध्ये सन्नाटा आहे. नव्याने दिल्लीत निवडणूक लढविलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने जादू करीत काँग्रेसला मागे टाकत दिल्लीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
शीला दीक्षित यांच्या विरोधात लढताना अरविंद केजरीवाल यांनी बाजी मारत २५ हजार मतांनी विजय मिळवला. तर केजरीवाल यांच्या आपच्या दणक्याने दीक्षित यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये सुरुवातीचे कल पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत होती. आतापर्यंत सर्व ९० जागांचे निकाल उपलब्ध झाले असून, भाजप ४९ जागांवर तर, काँग्रेस ३९ जागांवर विजय मिळवला आहे. इतर पक्ष २ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळवले आहे.
नवी दिल्ली
दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल केला आहे. केजरीवाल यांनी २५ हजार ८६४ मतांनी पराभूत केले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या `आप` जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र असून या पक्षाने २८ जागांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 'आप'ला केवळ ११ ते १६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत आपने चांगलीच मुसंडी मारली.
७० जागांसाठीची मतमोजणी झाली असून दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमीमध्ये चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपने ३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे दिल्लीत भाजप काठावर असल्याची परिस्थिती आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधली आहे. १५७ जागांवर विजय मिळवला असून अजूनही १० जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने आताच स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
यापूर्वी, निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपने सुरूवातीला ८३ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसले. ही आघाडी कायम असून मध्य प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवून हॅटट्रिक साधण्याची शक्यता आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेस पक्ष राज्यामधील ५२ जागांवर आघाडीवर तर अन्य १३ जागांवर आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत.
राजस्थान
राजस्थानमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे