अंबरनाथमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Updated: Mar 14, 2013, 05:59 PM IST

www.24taas.com, अंबरनाथ
अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ब्रिलियंट क्लासेसमध्ये बीजगणिताच्या पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका वाटण्याचा प्रकार सुरू होता. मात्र पोलिसांना या सर्व प्रकाराची आधीच खबर मिळाली होती.
त्यामुळं पोलिसांनी योग्यवेळी छापा घालून क्लासेसचा मालक फिरोज खान याला रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी फातिमा शाळेचे परीक्षा नियंत्रक ऑशियन डिसुजा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी ब्रिलियंट क्लासेसचा चालक फिरोज खान याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे .
पोलीस अधिक तपास करीत आहेत. फिरोज खान याला सदर पेपर कसा मिळाला यात कोणत्या शिक्षकाचा समावेश आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.