www.24taas.com, माथेरान
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर माथेरानच्या ‘रोप-वे’ला भुजबळांचा हिरवा कंदील दाखवलाय. साडे पाच किलोमीटरचा हा रोप-वे दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी या रोप-वेला हिरवा कंदील दाखवलाय. सोमवारी त्यांनी माथेरानमध्ये रोपवेसंदर्भात पाहणी केली. भूतवली गावापासून हा रोप-वे सुरू होणार आहे. साडे पाच किलोमीटरचा हा रोप-वे माधव गार्डनपर्यंत पोहचणार आहे. या ‘रोप वे’ची लांबी ४९०० मीटर तर उंची७५० मीटर असणार आहे . सदर रोप - वे प्रात्येक तासाला किमान ४०० प्रवाशांची वाहतूक करणार असून त्याचाप्रातिसेकंद पाच मीटर वेग असणार आहे . तसेच या रोप-वे मध्ये प्रवाशी आणि माल वाहतुकीचीही सुविधाअसणार असेल.
दोन वर्षांत रोप वेचं काम पूर्ण होणार त्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन निधीतून 670 कोटी मिळणार आहेत. माथेरान रोप वे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकासक म्हणून जाहीर करण्याची अंतिमअधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे .