www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र सुंदरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबे हिने महाराष्ट्र सुंदरीचा मुकुट पटकावला. या स्पर्धेत देवगडची मयुरी राणे आणि मुंबईची नयना मुके उपविजेत्या ठरल्या.
कोल्हपूरची रागिणी दुबे ही केमिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. सुरुवातीपासूनच रागिणी अत्यंत आत्मविश्वासाने भरलेली वाटत होती. प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये तिला विचारण्यात आलं, की तुला भारताचं पंतप्रधान बनवल्यास तू काय करशील? यावर तिने भारतीय महिलांच्या शिक्षणावर भर देऊन त्यांचे सबलीकरण करू असं उत्तर दिलं. या उत्तरामुळेच अंतिम फेरी जिंकून तिने महाराष्ट्र सुंदरीचा मान मिळवला. आता रागिणीला गोव्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली होती. यात २१ मुलींचा समावेश होता. पहिली फेकी पारतीय पारंपरिक साडीमध्ये तर दुसरी पाश्चात्य पेहेरावातील झाली. या स्पर्धेत रत्नागिरीची कस्तुरी रेडीज बेस्ट स्माईल, नयना मुके बेस्ट कॅटवॉक, पुण्याची सुरभी हांडे बेस्ट फोटोजेनिक फेस, मुंबईची हेमा गाडिया बेस्ट हेअर, मयुरी राणे बेस्ट कॉस्च्युम आणि मुंबईची शुभांगी नांगर बेस्ट पर्सनॅलिटीची मानकरी ठरली. या स्पर्धेसाठी राजेंद्र साळवी, राधिका कवितके, मुंबईचे ऋषिकेश कोळी परीक्षक होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.