www.24taas.com, सिंधुदूर्ग
सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तिलारी या धरणाचं पाणी गोव्याला देण्यावरुन गुंता निर्माण झाला होता. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि आमदार दिपक केसरकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.
या धरणामुळे विस्तापित झालेल्यांना नोकरी आणि नुकसान भरपाई म्हणुन प्रत्येकी 10 लाख द्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती,त्यानर त्यांनी लवकरच तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे.
या आश्वासनानंतर 23 दिवसांनी आंदोलन मागे घेण्यात आलं आता गोव्याचा तिलारी कालव्यातून होणारा पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे.