`स्मृती इमारत` दुर्घटनेवर राजकारण सुरू!

मुंब्र्यातली स्मृती बिल्डिंग कोसळल्यानंतर आता राजकारणाला वेग आलाय. या दुर्घटनेनंतर मुंब्राकरांनी उत्सुफूर्तपणे संपाची हाक दिली

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 21, 2013, 02:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंब्रा
मुंब्र्यातली स्मृती बिल्डिंग कोसळल्यानंतर आता राजकारणाला वेग आलाय. या दुर्घटनेनंतर मुंब्राकरांनी उत्सुफूर्तपणे संपाची हाक दिलीय.
अतिधोकादायक इमारतींना 48 तासात पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. ही जागा न मिळाल्यास सरकारच्या घरांवर जबरस्तीने कब्जा करु असा इशाराही त्यांनी दिलाय.
दरम्यान, मुंब्र्यात इमारत कोसळण्याची घटना पुन्हा घडली असताना पोलीस आणि प्रशासनाला याचं किती गांभीर्य आहे, असा प्रश्न निर्माण झालाय. ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी याबाबत बोलताना अशा घटना घडतच असतात, असं म्हटलंय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.