पनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई

पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2013, 11:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.
कपल डान्सबारवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून ३२ अल्पवयीन मुलींसह ९० बारबालांची सुटका केली. या धाडीत सव्वा कोटींची रोकड आणि ८०७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. त्या घटनेची गंभीर दखल गृहमंत्र्यालयाने घेतले आहे.

सायन-पनवेल महामार्गावर कपल बारवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. पहाटे २ वाजता ही धाड टाकण्यात आली.या बारमधून इतर बारमध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
दरम्यान, पनवेल येथील कपल लेडीज बारप्रकरणी नवी मुंबई परिमंडल २ चे पोलीस उपायुक्‍त प्रमोदकुमार शेवाळे यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे; तर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडवले यांची बदली करण्यात आली आहे.