मोदींची स्वारी ‘रायगडा’वर…

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रायगडावर दाखल झालेत. इथं मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 12:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रायगडावर दाखल झालेत. इथं मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं.
सांगलीच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या महानगड ते रायगड या यात्रेचा समारोप आज मोदींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी मोदी यांची रायगडवरच्या माळमध्ये सभाही होणार आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या रायगडावर मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नरेंद्र मोदींच्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता आहे.. रायगडमधला कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी योगगुरु बाबा रामदेव यांच्या व्यासपीठावर दिसणार आहेत.. बाबा रामदेव यांनी तालकटोरा स्टेयिमवर आपल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय... लोकसभा निवडणुकांसाठी मोदींना सशर्त पाठिंबा देणार असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.. परदेशातून काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिल्यास पाठिंबा देणार असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.
मोदींच्या या रायगड दौऱ्यानिमित्त या परिसरातल्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. रायगडावर महाराष्ट्र आणि गुजरातचे तीन हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.