www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
अक्षय्य तृतीयेचा `लाभ` पदरात पाडून घेतल्यानंतर ठाण्यातल्या घाऊक व्यापाऱ्यांनी आजपासून पुन्हा `एलबीटी` विरोधात आंदोलन सुरु केलंय.
घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या गटानं बेमुदत बंदची हाक दिलीय. शहरातल्या नौपाडा भागातल्या मुख्य बाजारपेठेतले व्यापारी या बंदबाबत आग्रही आहेत. मात्र, इतर व्यापारी बंदच्या विरोधात असल्यानं व्यापाऱ्यांच्या गटात फूट पडल्याचं चित्र आहे. त्यात मनसेनंही आता लोकांना वेठीला धरणाऱ्या या आंदोलनाला विरोध सुरू केलाय.
ठाण्यात एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला मनसेनं सक्रीय विरोध सुरू केलाय. लोकांना वेठीला धरून बंद न करण्याचं आवाहन करूनही आज सकाळपासून दुकानं बंद होती. याविरोधात वागळे इस्टेट परिसरातली बंद दुकानं जबरदस्तीनं उघडायला लावली. व्यापुढेही व्यापाऱ्यांनी बंद सुरू ठेवला, तर मनसे स्टाईल आंदोलन करून दुकानं फोडू असा इशारा पुन्हा एकदा देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.