www.24taas.com, चिपळूण
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही विवाह सोहळा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. चिपळूणमध्ये आयकर विभागानं सोमवारपासूनच चौकशी सुरू केलीय.
भास्कर जाधवांच्या मुलाचा शाही लग्न सोहळा आयोजनात सहभागी असणाऱ्यांची चौकशी आयकर विभागानं सुरू केलीय. या लग्नाच्या मंडप डेकोरेटर्स राजन कोकाटे यांची चौकसी आयकर विभागानं सुरू केलीय. तसंच लग्नासाठी जागा दिणारे जमीनमालक डॉ. जोशी यांचीही चौकशी केली जातेय.
जाधव यांच्या मुलाच्या लग्नाचा ताजमधील रिसेप्शनचा खर्च ८२ लाखांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जाधव यांच्या मुलाच्या शाही विवाहासाठी उद्योगमंत्री नारायण राणे सहकुटुंब, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, हसन मुश्रीफ, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुंनगंटीवार आदींसह राजकीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती