www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाकडे महसूल प्रशासन गांभिर्याने बघत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
मंडणगड तालुक्यातील सावित्री खाडीपात्रात म्हाप्रळ येथे रेती बंदर परिसरात राजरोजपणे रेती सेक्शन पंपाच्या मदतीने काढली जाते. मात्र या उपशाकडे महसूल प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तसेच या ठिकाणी दिवसाढवळ्या वाळू सक्शन पंपाने काढली जाते.
याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रारी केल्यात मात्र या तक्रारींकडे प्रशासन गांभिर्यांने बघत नाही. संगमेश्वरमधील करजुवे, बुरमबाड, धामापूर, चिपळूण तालुक्यातील गोवळकोट परिसर, दापोलीतील म्हैसोंडे, आंजर्ले तर खेडमध्ये मुंबके आणि कर्जीत वाळूचा उपसा बिनभोबाटपणे सुरू आहे. ग्रामस्थांकडून गेल्या तीन दिवसात सुमारे 103 अर्ज वाळू उपसा थांबवण्याचे आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.