www. 24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.
पावसामुळं मुंबई आणि ठाणे परिसरातल्या मनपाच्या तसेच अनेक खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आलीय. महापालिकेनं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय.
कल्याण-डोंबिवलीतही पावसाची रिपरिप सुरूय. पावसामुळं ठाणे महापालिकेच्या ७४ शाळा सोडण्याचे आदेश दिलेत. मुंबईला जाणारा चाकरमानी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर कल्याण डोंबिवली हून लोकलनं प्रवास करतो. मात्र मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यानं २५ -३० मिनिटे लोकल धावतायत.
पालघर डहाणू परीसरात रात्रीपासुन जोरदार पाउस सुरु असून सूर्या, वैतरणा, दहेर्जा नदिला पूर आलाय. डहाणूत सकाळी शेतावर जात असलेल्या दक्षा सुनील बोभादे (२६) या महिलेचा काठी नदित वाहुन मृत्यू झालाय.
सूर्यानदीवरील मासवण पुल पाण्याखाली गेल्यामुळं पालघर – मनोर मुख्य रस्त्यांची वाहतूक ठप्प झालीय. शिवाय जवळपास वीस ते पंचवीस गावांचा पालघरपासून संपर्क तुटलाय. सूर्या ,कडवास, धामणी धरणं ओव्हफ्लो झाल्यानं घरणं क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.