डोंबिवली केमिकल स्फोट : तिघांना घेतले ताब्यात, आग विझली

डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 6, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, अमित भिडे, डोंबिवली
डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
गणपत गायकर या जमीन मालकाला तर मनोज आणि राजेश गुप्ता या भंगार व्यवसाय करणा-यांना ताब्यात घेतलंय. स्फोट इतका भयानक होता की दोन किलोमीटर परिसतातील इमारतींनाही स्फोटाचा हादरा बसला. स्फोटाच्या ठिकाणापासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेल्या रिजन्सी इस्टेट या भागात स्फोटातून उडालेला एक पत्रा एका व्यक्तिवर पडून त्याचा मृत्यू झाला.
ज्या टाकीचा स्फोट झाला त्याच्याशेजारी असलेल्या इतरही दोन-तीन टाक्या फेकल्या गेल्या. त्यातली एक टाकी जवळ असलेल्या एका बैठ्या चाळीवर पडली त्यामुळे पाच घरांचं नुकसान झालंय. हा भंगार डेपो अधिकृत होतं की अनधिकृत याचा शोध घेण्याचं काम पोलीस करतायत. या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसी लगतच्या अनधिकृत भंगार डेपोंचा मुद्दा उजेडात आलाय. अशा डेपोंवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी स्थानिक करतायत.
एका टाकीचं झाकण उडालं आणि रिजन्सी डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, दोन किमी परिसरातल्या इमारतींना या स्फोटाचे हादरे जाणवले. स्फोट झाल्यावर उरलेल्या तीन टाक्या आजूबाजूच्या चाळीवर येऊन पडल्या. एमआयडीसी परिसरातल्या दावडीनाका परिसरात ही घटना घडली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.