www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
२० फेबुवारी १६७२ च्या लंडन गॅझेट या नियतकालिकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख दरोडेखोर, लुटारू असा केला होता. म्हणून त्याच लंडनमध्ये शिवरायांचे ‘शिवाजी द रियल हिरो’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्वेली बुक्स करणार आहे.
शिवजयंतीला १ मार्च २०१४ रोजी या पुस्तकच प्रकाशन प्रसिध्द प्रवचनकार,धर्मभूषण,भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे यांच्या हस्ते होणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरदरे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलीय. तब्बल १८ वर्ष शिवरायांची चित्र रेखाटणारे ब्रिजेश मोगरे यांच्या चित्रांच हे पुस्तक असणार आहे. शिवराय सा-यांना कळावे या हेतूने हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित होणार असल्याची माहिती पुस्तकाचे प्रकाशक विवेक मेहत्रे यांनी दिली.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जाण्याची संधी डोंबिवली उत्सवात येउन तुम्हीही घेऊ शकता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्वतः डोंबिवली उत्सवात इथं आले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.