www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर कालपासून नॉट रिचेबल आहेत. काल रात्री शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालिकेत राजकीय राडा पाहायला मिळाला. भाजपच्या भेटीनंतर मिलिंद पाटणकर नॉट रिचेबल आहेत. दरम्यान काल उपमहापौर मिलिंद पाटणकरांच्या केबिनच्या तोडफोड प्रकरणी मनपानं अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला दणका देत परिवहन समितीच्या निवडणुकीत आघाडीनं बाजी मारल्यानं युतीला पराभव जिव्हारी लागलाय. यासगळ्या राजकीय आखाड्याला भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर हे कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्याचबरोबर पदाचा राजीनामा देणाऱ्या पाटणकर यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षाच्या नगरसेवकांनी केलीय.
ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय. भाजपचे मत पुटल्याने शिवसेना सदस्य अधिक आक्रमक झालेत. अजय जोशी फुटल्यानं महापालिकेत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली. उपमहापौर मिलींद पाटणकर यांच्या केबीनची तोडफोड करण्यात आली. शैलेश भगत यांचा अर्ज भरतानाही आघाडी आणि शिवसेना सदस्यांमध्ये हाणामारी झाली होती.
भगत यांच्या बंडखोरीनं बुधवारी ठाणे महापालिकेच्या आवारात राजकीय हाणामारीही झाली होती. त्यातच शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत सभापतीपदी निवडून आल्याने पालिकेत वातापरण गरम होतं. या सगळ्याला मिलिंद पाटकर जाबाबदार असल्याचा आरोप करत पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.