सोनी एक्सपीरियाचे कमी बजेटचे दोन स्मार्टफोन

आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Updated: Mar 8, 2014, 04:43 PM IST

www.zee24tass.com, झी मीडीया, मुंबई
आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. एक्सपीरिया E१ आणि E१ ड्युअल हे दोन्ही स्मार्टफोन ड्युअल सिमचे असून, खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहेत.
दोन्ही स्मार्टफोनची स्क्रिन ४ इंच आणि रिजोल्यूशन ४००X८०० पिक्सेल आहे. हे ऍण्ड्रॉयड ४.३ वरही (जेली बिन) चालते. या मोबाईल फोनच्या मागे ३ मेगापिक्सल कॅमेरा असून, १००डी लाउड ऑडियो रेडियो आउटपुट स्पीकर आहे. त्यामुळे हा मोबाईल संगीत प्रेमीमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरणार आहे. या मोबाईमध्ये ब्लूटूथ, वाय - फाय आणि जीपीएस व्यवस्था केली आहे. यांची ४ जीबी मेमरी आहे आणि ३२ जीबीपर्यंत आपण मेमरी वाढवू शकतो.
एक्सपीरिया E१ ड्युअलची खासियत म्हणजे या नवीन ड्युअल तंत्रज्ञानाने आपण एकही कॉल मिस करु शकत नाही. म्हणजेच दोन्ही सिम अॅक्टिव ठेवू शकतो. पहिलं सिमवर आपण बोलत असू आणि दुसऱ्या कॉल येत असेल तर आपण तोही कॉल घेऊ शकतो. सोनी कंपनी हे दोन्ही मोबाईल १० मार्चपर्यंत बाजारात आणणार आहे. त्यांची किंमत ९४९० आणि १०४९० रुपये जाहीर केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.