www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ हा नवीन फोन कॉड-कोर प्रोसेससह काल लॉन्च केला.
सॅमसंग गॅलेक्सीच्या यशानंतर कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी २’ हा फोन बाजारात आणला आहे. परंतु, या मोबाईलची किंमत अजून ठरवण्यात आलेली नाही.
या मोबाईल फोनमध्ये १.२ गीगाहर्ट्सचा पॉवरफूल कॉड-कोर प्रोसेस आहे. तर यांची रॅम १.५ जीबीची आहे. तसेच मागील कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा असून त्याला एलईडी फ्लॅश आहे. तर समोरील कॅमेरा १.९ मेगापिक्सल देण्यात आला आहे. यात एंड्राइडचा ४.३ जेली बीन प्रोसेसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी २ हा फोन काळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगात काही ठराविक प्रदेशाप्रमाणे उपलब्ध होणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस ४ आणि गॅलेक्सी नोट ३ या फोनप्रमाणे यात एस भाषांतर, एस ट्रॅव्हल आणि ग्रुप खेळ दिले आहेत.
या फोनची वैशिष्ट्ये -
- १.२ गीगाहर्ट्स कॉड-कोर प्रोसेसर
- ५.२- इंच एचडी टीएफटी डिस्प्ले
- ७२०-१२८० पिक्सल स्कॅन
- एंड्राइड ४.३ जेली बीन प्रोसेसर
- ८ मेगापिक्सल कॅमेरा एलईडी फ्लॅश
- १.९ मेगापिक्सल समोरील कॅमेरा
- ८ जीबी मेमरी मोबाईलमध्ये आणि मेमरी कार्डमध्ये ६४ जीबी ठेवता येणार आहे.
- २६०० मेगाहर्ट्स बॅटरी
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.