www.24taas.com,नवी दिल्ली
ग्राहकांसाठी मेगा खरेदी करण्याची ऑनलाईन संधी मिळणार आहे. ही १२ डिसेंबरपासून मिळू शकेल. ऑनलाईन शॉपिंगचा महाकुंभ मेळावा होत आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त वेबसाइट्स सहभागी झाल्या आहेत. रिटेल कंपन्यांनी खरेदीवर डिस्काऊंटची ऑफर लागू केली आहे.
ऑनलाईन शॉपिंग किंवा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिस्काऊंटची चांगली ऑफर असणार आहे. त्यामुळे पहिलांदा ऑनलाईन खरेदी करण्याऱ्यांना याचा चांगला लाभ मिळणार आहे. अमेरिकेतील ऑनलाईन शॉपिंगच्या संकल्पनेवर खरेदीची संकल्पना मांडण्यात आलीय. यामध्ये रिटेल व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुगलने पुढाकार घेत ५० पेक्षा जास्त वेबसाईटनी सहभाग घेतला आहे. १२ डिसेंबरपासून ही ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली सुट देण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक वेबसाईटची ऑफर वेगवेगळी असेल. मात्र, उद्योग क्षेत्र्यातील सूत्रांकडून सांगण्यात आलेय की, मोबाईल आणि टॅब्लेट यांच्या एमआरपी पेक्षा ३०-४० टक्के, गृहउपयोगी वस्तूंवर ६०, ब्रॅंडेड चपल, बुडवर ७० टक्के तर सोन्याच्या खरेदीवर १५-२० टक्के आणि पुस्तक खरेदीवर २० टक्के सुट देण्यात येणार आहे. नामांकित कंपनींच्या कपड्यांवर ५० टक्के सुट तर ट्रव्हल बॅग्जवर ३० टक्के ही सुट असणारआहे.
ज्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केली आहे. त्यांचा माल घरपोचही देण्यात येणार आहे. यासाठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. जे ग्राहक पहिलांदा ऑनलाईन खरेदी करणार आहेत, त्यांच्यासाठी खरेदी व्यतीरिक्त १२ टक्के सुट देण्यात येणार आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये Makemytrip.com, Fflipkart.com, ebay.com, sulekha.com, homeshop18.com, snapdeal.com, yatra.com, yebhi.com, cromaretail.com, goindigo.in या नामांकित वेबसाईट असणार आहे.
देशात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. आज १४ कोटी लोक इंटरनेटचा उपयोग करीत आहेत. २००० कोटी रूपयांची ऑनलाईन उलाढाल आहे. ऑनलाईन खरेदीही ग्राहकांसाठी फायदेशीर बाब ठरली आहे. कारण रिटेल कंपन्यांचा स्टोअर्स् आणि कर्मचाऱ्यांचा खर्च वाचतो. त्यामुळे याचा फायदा ग्राहकांना जास्त सुट देण्यात होतो.