पॅनबाबत ऑनलाईन अर्ज, करा बदल

तुम्हाला नवे पॅन कार्ड काढायचे आहे. तर ते कोणाची मदत न घेता काढता येऊ शकणार आहे. किंवा पॅनमध्ये अद्यावत माहिती असायला पाहिजे. तसेच बदल करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2013, 10:11 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
तुम्हाला नवे पॅन कार्ड काढायचे आहे. तर ते कोणाची मदत न घेता काढता येऊ शकणार आहे. किंवा पॅनमध्ये अद्यावत माहिती असायला पाहिजे. तसेच बदल करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहात.
अनेक खरेदी-विक्री व्यवहार करताना किंवा गुंतवणूक, इन्कम टॅक्स रिटर्न भरताना परमनंट अकाउंट नंबर (पॅन) द्यावा लागतो. त्यामुळे `पॅन`मधील माहिती अद्ययावत आहे, का याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवे कार्ड अथवा बदल करण्यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून करू शकता. यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत. एनएसडीएलच्या वेबसाइटवर www.tin-nsdl.com हा फॉर्म उपलब्ध आहे. बदल किंवा अत्यावत माहिती भरायची असेल तर हॉक्स साईटवर डाव्या बाजूस असतो आणि तो आवश्यक बघावा.
कार्डबाबतची सर्व माहिती भरल्यानतंर तो सादर केल्यावर स्क्रीनवर अॅक्नॉलेजमेंट दिसते. ती सेव्ह करून तिची प्रिंट काढावी. त्यावर सही करून त्या अर्जाबरोबर दोन रंगीत फोटो जोडावेत. कार्डमध्ये काही सुधारणा करण्यासाठी अर्ज केला असल्यास ओळख , रहिवासी पुरवा द्यावा लागतो. कार्डमध्ये कोणताही बदल करायचा झाल्यास त्याबरोबर बदलाबाबतची आवश्यक कागदत्रे ही जोडावी लागतात.

यासाठी प्रक्रिया फी ५५ रुपये असते आणि या व्यतिरिक्त सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो. डिमांड ड्राफ्ट , चेक , डेबिट वा क्रेडिट कार्ड वा नेट बँकिंग मार्फत शुल्क भरता येते. पॅन कार्ड हरविल्यास नव्या कार्डसाठी अर्ज करताना सर्व रकाने भरणे आवश्यक आहे. अर्जाबरोबर पॅन हरविल्याची एफआयआर जोडावी लागते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.