इंजिनिअरिंगसाठी आता फक्त JEE

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी केंद्राच्या JEE च्या प्रस्तावाला राज्यसरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता राज्यातही इंजिनिअरिंगसाठी CET ऐवजी JEE म्हणजेच जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम परिक्षा द्यावी लागणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 12, 2012, 06:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी केंद्राच्या JEE च्या प्रस्तावाला राज्यसरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता राज्यातही इंजिनिअरिंगसाठी CET ऐवजी JEE म्हणजेच जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम परिक्षा द्यावी लागणार आहे.इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी देशभर एकच परिक्षा असावी हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी केंद्रानं राज्यसरकारांपूढे JEE चा प्रस्ताव ठेवला होता. याबाबतचा निर्णय राज्यसरकारांनी घ्यायचा होता. त्यानुसार मंत्रीमंडळात याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. यापुढे म्हणजेच 2014 पासून राज्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आता JEE द्यावी लागणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी बारावीच्या गुणांना 50-50% महत्त्व आहे. तर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आता 50 टक्के गुणांची आवश्यकता असणार.
दरम्यान, उच्च शिक्षणात आपल्या देशाची स्थिती किती बिकट आहे, याचं आणखी एक विदारक चित्र समोर आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शैक्षणिक संस्थांसाठी मानाच्या समजल्या जाणा-या क्यू.एस. मानांकनाची २०१२ सालची यादी काल प्रसिद्ध झाली. यात टॉप 200 यादीत एकही संस्था नसलेला भारत हा ब्रिक्स देशांमधला एकमेव ठरलाय. या यादीत आयआयटी बंगळूरचं मानांकन पुरतं घसरलंय. २०१० साली १८७व्या स्थानी असलेली ही संस्था यंदा २२७व्या स्थानावर घसरलीये.
आयआयटी दिल्ली आणि आयआयटी कानपूर या 2 संस्थांचं मानांकन किंचित सुधारलंय. मात्र ब्राझिल, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या गटात भारताची स्थिती सर्वात हालाखीची आहे. या यादीत अमेरिकेतली एमआयटी ही संस्था अग्रस्थानावर आहे.