www.24taas.com, झी मीडिया, लंडन
फिनलँड स्थित मोबाईल निर्माती कंपनी नोकियानं नवीन मेटल डिझाईन आणि अधिक सक्षम कॅमेरा असलेला स्मार्टफोट लॉन्च केलाय. ‘ल्युमिया ९२५’ असं या मोबाईलचं नामकरण करण्यात आलंय.
नोकियानं मंगळवारी आपला नवा स्मार्टफोन ग्राहकांसमोर सादर केला. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जवळजवळ ४०० पौंडच्या या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल, अशी घोषणाही यावेळी कंपनीनं केलीय.
भारतात ल्युमिया ९२५ लॉन्च कधी होणार? या प्रश्नावर उत्तर देताना नोकिया स्मार्टफोन डिव्हाईसचे कार्यकारी उपाध्यक्ष ‘जो हालरे’ यांनी आम्ही लवकरच याविषयी घोषणा करू असं म्हटलंय. ‘भारतीय बाजारपेठ ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ आहे’.
ल्युमिया ९२५ आणि ल्युमिया ९२८ ही कंपनीची प्रमुख उत्पादनं आहेत. भारत ही आमच्यासाठी एक प्रमुख आणि मोठी बाजारपेठ बनलीय आणि आम्ही त्यासाठी भारताला प्राधान्य देणार आहोत.
नोकिया ९२५ चे फिचर्स
> प्युअर व्ह्यू ८.७ मेगापिक्सचा कॅमेरा आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन, ऑटोफोकस, हाय पॉवर ड्युएल एलईडी फ्लॅश आणि १.२ मेगापिक्सल वाइड अँगल फ्रंट कॅमेरादेखील आहे.
> नोकियानं या फोनमध्ये आधुनिक स्मार्ट कॅमेरा सॉफ्टवेअरचा वापर केलाय. या स्मार्ट कॅमऱ्याबरोबर एकाच वेळी १० फोटो काढले जाऊ शकतात. युजर्स आपल्याला हवा तो फोटो निवडू शकतात.
> नोकिया ल्युमिया ९२५ मध्ये १०८० पी एचडीचं व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधादेखील उपलब्ध आहे.
> ल्युमिया ९२५ मध्ये १२८० X ७६८ रिजॉल्युशनचा ४.५ इंचाचा एमोलेड व्हीएक्सजीए डिस्प्ले आहे. ४.५ इंचाच्या डिस्प्ले स्क्रीन असल्यामुळे हा फोन अॅपल आयफोन ५ पेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं जातंय.
> या फोनमध्ये १.५ गीगाहर्टझ ड्युएल-कोर स्नैपड्रॅगन प्रोसेसर आहे.
> या फोनमध्ये एक जीबी रॅम आणि १६ जीबीचं स्टोरेट उपलब्ध आहे.
हा फोन विंडोज ८ वर चालतो.
> या फोनमध्ये २०००mAH ची बॅटरी आहे.
> ल्युमिया ९२५ सध्या काळा, सिल्व्हर आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.