नोकिया लुमिया 520 Vs नोकिया लुमिया 525: <b><font color=red>तुलना</font></b>

विंडोज फोनच्या यशानंतर अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला नोकियाचा लुमिया 525 आणि 1320 फाबलेट बाजारात आला असून त्याची अनुक्रमे किंमत १०३९९ आणि २३९९९ आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 8, 2014, 05:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विंडोज फोनच्या यशानंतर अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला नोकियाचा लुमिया 525 आणि 1320 फाबलेट बाजारात आला असून त्याची अनुक्रमे किंमत १०३९९ आणि २३९९९ आहे.
स्मार्टफोनच्या बाजारात या विंडोज फोनमुळे चांगली स्पर्धा वाढली असून ग्राहकांना अधिक ऑप्शन मिळाले आहेत.
नोकिया लुमिया 525 मुळे अनेकांनी याची मोबाईलची तुलना नोकिया लुमिया 520 शी करण्यास सुरू केले आहे. यात काय समानता आहे आणि काय वेगळेपण आहे हे जाणून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे.

डिस्प्ले
नोकिया लुमिया 525 आणि नोकिया लुमिया 520 या दोन्ही फोनच्या डिल्प्लेचा विचार केला तर याची 4-inch IPS LCD (480x800 pixels) डिस्प्ले आहे. दोन्ही फोनचं वजन हे १२४ ग्रॅम आहे. त्यामुळे तुलना करता डिस्प्लेच्या बाबतीत कोणीही विजेता नाही कोणी पराभूत झाले नाही.
प्रोसेसर
या बाबतीतही दोन्ही फोन सेम आहेत. या दोन्ही फोनचा प्रोसेसर हा 1 गीगाहर्ट्स ड्युअल कोअर, क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन एस 4 प्रोसेसर आहे.
ऑपरेटिंग सिस्टीम
मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम आहे. विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम लुमिया सिरीजमध्ये वापरण्यात आला आहे. नोकिया लुमिया ५२० मध्ये ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. ती सिस्टिम नोकिया लुमिया 525 मध्ये वापरण्यात आली आहे.
कॅमेरा
नोकिया लुमियाच्या स्मार्ट फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा वापरण्यात आला आहे. यात सिनेग्राफ लेन्स, पॅनोरामा लेन्स, बिंग व्हिजन फिचर कॅमेऱ्यात वापरण्यात आले आहे. हा कॅमेरा नोकिया लुमिया 520 आणि 525 मध्ये वापरण्यात आला आहे. या दोन्ही व्हर्जनमध्ये फ्रंट कॅमेरा वापरण्यात आला नाही. 520 मध्ये वापरण्यात आला नाही तो 525 मध्ये वापरण्यात आला असावा असे वाटत होते पण कंपनीने हे फिचर दिले नाही. मागील कॅमेरा हाय डेफिनेशन व्हिडिओ 720p at 30fps दृश्य कॅप्चर करतो.
रॅम
रॅमचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा दोन्ही फोनमध्ये फरक आपल्याला दिसतो. लुमिया 520 मध्ये 512 एमबी रॅम वापरण्यात आली आहेत तर लुमिया 525 मध्ये 1 जीबी रॅम वापरण्यात आली आहे. त्यामुळे फोन अधिक फास्ट झाला आहे. त्यामुळे तुम्ही एकावेळी अधिक अप्स वापरू शकतात.
मेमरी
८ जीबी इंटरनल मेमरी आहे. त्यामुळे बजेट स्मार्ट फोनसाठीही अत्यंत चांगली मेमरी मानली जाते. तसेच ही मेमरी ६४ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डमुळे वाढवता येते. तसेच मायक्रोसॉफ्टने ३१ जानेवारी अगोदर नोकिया फोन घेणाऱ्यांना २० जीबीची स्कायड्राइव्ह स्टोअरेज मेमरी दिली आहे.
बॅटरी
बॅटरीच्या आधारे ग्राहक निर्णय घेतात की किती दिवस बॅटरी बॅकअप असतो. तर स्मार्टफोन आणि लुमिया फोनमध्ये फरक केला असता. नोकिया बॅटरीच्या बाबतीत बाजी मारतो. लुमिया 520 ची लि-लॉन 1430 एमएएच बॅटरीचा २ जी नेटवर्कसाठी १५ तासांचा टॉकटाइम आहे तर ३ जी साठी १० तासांचा टॉकटाइम आहे. नोकिया लुमिया 525 मध्ये 1430 एमएएच बॅटरीचा २ जीसाठी १७ तासांचा टॉकटाइम आहे तर ३ जी साठी ११ तासांचा टॉकटाइम आहे.
लुमिया 520मध्ये 60 तासांचा म्युझिक प्ले आहे तर 525मध्ये ४८ तासांचा म्युझिक प्ले आहे.
किंमत
नोकिया लुमिया 520 हा विंडोजचा सर्वात परवडणारा फोन आहे. त्याची लॉन्चिंग किंमत १० हजार रुपये आहे. आता तो बाजारात ८ हजार ४०० रुपयांना उपल्बध आहे.
नोकिया लुमिया 525 याची किंमत १० हजार ३९९ रुपये आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.