www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फिनलॅण्डची कंपनी नोकिया सर्वात स्वस्त स्मार्टफोन `आशा २३०` लवकरच बाजारात लाँच करणार आहे. आशा ५०१ सारख्या दिसणाऱ्या `आशा २३०` मध्ये ड्युअल सिमची व्यवस्था केली आहे.
नोकिया `आशा २३०` च्या टचस्क्रीन टीएफटीची क्षमता असून, २.८ इंचाचा आहे. `आशा २३०` वजनाने अगदी ८९ ग्रॅम आहे. रिजॉल्यूशन ३२०X२४० पिक्सलच्या या `आशा २३०` चे डायमेंशन ५८.६X९९.५X१३.२ मिमी असेल.
मात्र या `आशा २३०` मध्ये १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा फक्त फोनच्या मागे आहे. यांच्या रॅम ६४ एमबी आहे आणि ३१२ जीबीचा एक माइक्रो एसडी स्लॉट आहे. नोकिया `आशा २३०` मध्ये जीआरपीएस, ब्लूटूथ असल्यामुळे वाय-फायचा पर्याय दिलेला नाही. तसेत हा फोन २जीला सपोर्ट करू शकणारा आहे.
नोकिया `आशा २३०` च्या बॅटरीची क्षमता १०२० एमएएच असून १२ तासापर्यंत आपल्याला फोनवर बोलण्याची आणि ३५ तासापेक्षा जास्त वेळ गाणी ऐकण्याची क्षमता आहे. नोकिया `आशा २३०` ची किंमत असून ठरवलेली नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.