नोकियाचा सर्वात स्वस्त डुअल सिम फोन

नोकिया मोबाइल्सने एक आणखी स्वस्त डुअल सिम फीचर फोन सादर केला आहे. याची किंमत केवळ 3,199 रुपये आहे. हा नोकिया सर्व स्टोअर्समध्य उपलब्ध आहे. नोकिया 225 असे याचे नाव असून हा फोन 4 वेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यापूर्वी स्वस्त फोन नोकिया 220 बाजारात आणला होता. त्याची किंमत 2,749 रुपये आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 19, 2014, 07:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नोकिया मोबाइल्सने एक आणखी स्वस्त डुअल सिम फीचर फोन सादर केला आहे. याची किंमत केवळ 3,199 रुपये आहे. हा नोकिया सर्व स्टोअर्समध्य उपलब्ध आहे. नोकिया 225 असे याचे नाव असून हा फोन 4 वेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यापूर्वी स्वस्त फोन नोकिया 220 बाजारात आणला होता. त्याची किंमत 2,749 रुपये आहे.
नोकिया 225 बरेच फिचर आहेत. यात अल्फा न्यूमरिक की पॅड आहे. याचे वजन केवळ 100 ग्रॅम आहे आणि याची जाडी 10.4 मिमी आहे. याचा स्क्रीन 2.79 इंचाचा आहे. या फोनचे रिझ्युल्यूशन 320x 240 पिक्सल आहे. हा 30 ओएसवर आधारित आहे. याची मेमरी कमी असून याला 32 जीबीचे एक्सटर्नल कार्ड लावता येते.
याच्या फोनला एकच कॅमरा आहे. जो 2 मेगापिक्सलचा आहे. यात एलईडी फ्लॅश नाही आहे. या शिवाय यात 2जी (जीआरपीएस), एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी आणि ब्लूटुथ 3.0 आहे. याची BL-4UL X बैटरी 1200 एमएएचची आहे. तीला 21 तासाचा टॉक टाइम आणि 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.