आता महिलांच्या पँटला स्पर्श जरी केला तर...

खिसेकापूंपासून सावध राहाण्यासाठी तसंच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी काशी येथील शाम चौरसिया याने स्पेशल शर्ट पँट तयार केले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 6, 2013, 04:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, काशी
खिसेकापूंपासून सावध राहाण्यासाठी तसंच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी काशी येथील शाम चौरसिया याने स्पेशल शर्ट पँट तयार केले आहेत. दिग्दर्शक, अभिनेता फरहान आख्तर याच्या आगामी फुकरे या सिनेमाच्या प्रमोशन च्या लाँचिंगच्या वेळी शाम चौरसियाला विशेष आमंत्रण दिलं होतं.
फरहान आख्तर याची फुकरे या सिनेमात जुगाड नावाची भूमिका आहे. त्यामुळे फरहानने काशी, नागपूर, लखनऊ, भोपाळ या शहरांमध्ये जुगाड शोकेसची स्पर्धा आयोजित केली होती. तांत्रिक शोध लावून जिंकलेल्या ५ तरुणांपैकी २ जणांना मुंबईत आमंत्रित करण्यात आलं. श्याम चौरसियाने महिलांची छेडछाड रोखण्यासाठी तसंच पाकिटमारांपासून खिसे संभाळण्यासाठी आगळं वेगळं संशोधन केलं आहे. त्याने असे शर्ट आणि पँट तयार केले आहेत, की ज्यांना स्पर्श केल्यास जोराचा झटका बसू शकतो.
या शर्ट आणि पँटला विशिष्ट बटणं असतील, आपल्या खिशाला किंवा पँटला कुणी हात लावत असेल, तर हे बटण दाबल्यास पँटला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला २२० व्हॉल्ट्सचा झटका बसतो. त्यामुळे महिलांची छेडछाड रोखली जाईल. तसंच खिसेकापूंपासूनही पाकिटं, पैसे सुरक्षित राहातील. हे संशोधन फरहान आख्तरला खूप आवडल्यामुळे श्याम चौरसियांना मुंबईला बोलावून घेण्यात आलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.