१०वीच्या निकालासाठी `मनसे`तर्फे हेल्पलाईन सुरू

दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.

Updated: Jun 6, 2013, 09:32 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. दहावीच्या निकालासाठी मनसेने विद्यार्थ्यांसाठी खास सोय केली आहे. बऱ्याचदा दहावीचा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये झुंबड उडालेली असते. तसेच अनेक विद्यार्थ्यी निकाल पाहत असल्याने वेबसाईटचे सर्व्हरही डाऊन होते. त्यामुळे निकाल पाहण्यात अडचण येते.
दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचण येऊ नये यासाठी अंबरनाथच्या कानसई विभागातील मनसे नगरसेवक कुणाल भोईर यांनी खास सुविधा उपलब्ध करू दिली आहे. विद्यार्थ्यांना निकाल आता मोबाईलवरही पाहता येणार आहे. फक्त आपला सीट नंबर एसएमएस केल्यास तुम्हांला निकाल पाहता येईल.
१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मनसे कानसई विभागातर्फे ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मनसे नगरसेवक कुणाल भोईर यांनी हा उपक्रम सुरू केल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
१०वीचा निकाल माहिती करून घेण्यासाठी Type करा. तुमचा Seat No. या 09322380174/09324132120 क्रमांकावर पाठवा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.