www.24taas.com, मुंबई
गुगलनं नेक्सस ७ टॅब्लेट भारतीय बाजारात आणलाय. अनेक फिचर असलेल्या या टॅब्लेटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. गुगलच्या प्ले स्टोअर मधून या टॅब्लेटची खरेदी करता येऊ शकते. याची स्टोअरेज क्षमता १६ जीबी आहे. पाच एप्रिलपासून गुगल प्ले स्टोअरवर हा टॅब्लेट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
गुगल नेक्सस-७ ‘आसुस’द्वारा तयार केला गेला आहे. याचा डिस्प्ले सात इंचाचा असून अॅन्ड्राइड ४.१ जेलीबीनवर तो चालतो. याचे रेझुल्यूशन १२८०/८०० पीक्सल एव्हढं आहे.
या टॅब्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या स्क्रिनवर स्क्रॅचेस पडणार नाहीत, अशी काच बसविण्यात आली आहे. टॅब्लेटमध्ये कोड कोर प्रोसेसरसह अॅन्ड्राइड ४.१ ऑपरेटिंग सीस्टम आहे. एक जीबी रॅमचा त्याला स्पीड असणार आहे. गुगल नेक्सस-७ टॅब्लेटची बॅटरी अॅक्टीव्ह असताना आठ तास चालू शकते. याशिवाय, नेक्सस-७ टॅब्लेटमध्ये वाय-फाय, ब्लू टूथ आणि अॅड्राइड डाटा ट्रान्सफरची सुविधा आहे.
गुगलने जून २०१२ मध्ये पहिल्यांदा नेक्सस-७ लॉन्च केला होता आणि एका महिन्यात तो बाजारात उपलब्ध करून दिला होता. लॉन्चिंगच्या नंतरच्या तीसऱ्याच महिन्यात सर्वाधिक विक्री होणारा टॅब्लेट म्हणून त्याच्या नावलौकीक प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे, गुगलेच चेअरमन एरिक स्मित यांनी एक दिवस आधीच गुगल नेक्सस-७ भारतात उपलब्ध न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, २६ मार्च रोजी नेक्सस-७ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नेक्सपस-७ या टॅब्लेटची सरळ स्पर्धा ही अॅतपलचा आयपॅड आणि सॅमसंग गॅलक्सीसोबत असणार आहे. यासोबतच भारतीय बाजारातील इतर स्वस्त टॅब्लेटशी असणार आहे.