www.24taas.com, मेलबर्न
साधारणत: १८ ते २५ वयाच्या व्यक्ती फेसबूक, ट्विटर, गुगल प्लससारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या बॉसलाही आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये दाखल करतात, असं एका सर्वेक्षणामध्ये आता स्पष्ट झालंय. या माध्यमातून आपोआपच बॉसच्या सगळ्या खबरबात त्यांच्यापर्यंत आपोआप पोहचतात. पण, हे कदाचित या बॉसना त्रासदायकही ठरू शकतं.
५८ टक्कांपेक्षा जास्त लोकांनी मान्य केलंय की त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर करिअरमध्ये अडथळे निर्माण करतील, अशी काही माहिती नाहीय. ऑस्ट्रेलियातील कामगारांपैकी १३ टक्के कामगार, एखादा कामाचा दिवस खराब गेला की कंपनी किंवा बॉसबद्दल काहीतरी अपमानास्पद माहिती सोशल नेटवर्कीग साइटवर लिहायचे आणि या सर्वाचा छडा ११ देशांतील ४,४०० व्यक्तींमध्ये करण्यात आलेल्या अॅन्टी व्हायरस कंपनी ‘एव्हीजी’द्वारे सर्वेक्षणात लावण्यात आलाय.
इटलीतील अठरा टक्के कामगार आपल्या भावना ऑनलाइन व्यक्त करतात, ही माहिती एका न्यूज एजन्सीनं दिलीय. स्पेनमधील ८० टक्के तरूण कामगार वर्गानं सोशल नेटवर्किंग साइटवर आपण कधीतरी कामासंबंधी (अयोग्य) फोटो, माहिती प्रकाशित केल्याचं कबूल केलंय. याच गोष्टीवर ऑस्ट्रेलियातील २८ टक्के कामागारांनीदेखील आपण असं केल्याचं मान्य केलंय. एव्हढच नाही तर या संशोधनात १२ टक्के तरूण ऑस्ट्रलियन तरुणांनी त्यांना मुलाखातीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहिती ऑनलाइन जाहीर केल्याची माहिती मिळालीय. यावरुनाच ‘सोशल नेटवर्किंगची असलेली अमर्यादित सीमारेषेमुळे तरूण कामगार, मालक आणि खाजगी व्यवस्थापन यांच्यामधील अंतर सध्या कमी होत चालल्याचं, ‘एव्हीजी’चे ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी सल्लागार मायकल मॅककिनॉन यांनी म्हटलयं.
पण त्याचबरोबर, ‘कंपनी किंवा बॉसबद्दल सोशल नेटवर्किंग साईटवर अपमानास्पद बोलणं यासारख्या गोष्टींना काही अर्थ नाही, पण या सगळ्या गोष्टी करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की, कदाचित या गोष्टींचा परिणाम तरूणांच्या करिअरवरही आणि परिणामत: त्यांच्या भविष्यावरही होऊ शकतो’ असं मायकल यांना वाटतंय.