अॅपलचा आयपॅड मिनी बाजारात

अमेरिकेत बहुप्रतिक्षीत आयपॅड मिनीचे आज अनावरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये नवीन ‘आय-फोन ५’ लाँच करीत अँपलने त्याचवेळी मिनी आयपॅडची चाहूल जगाला करून दिली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 24, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, कॅलिफोर्निया
अमेरिकेत बहुप्रतिक्षीत आयपॅड मिनीचे आज अनावरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये नवीन ‘आय-फोन ५’ लाँच करीत अॅपलने त्याचवेळी मिनी आयपॅडची चाहूल जगाला करून दिली होती.
अॅपलने मंगळवारी सॅन जोन्सग येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर यांनी नव्याग आयपॅड मिनीच्या खास फिचर्सची माहिती दिली. येत्या् २ नोव्हेंबरपासून आयपॅड मिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्धा होईल. मात्र, तो भारतात कधी मिळेल याचा उलगडा अद्याप करण्यात आलेला नाही.
१० इंच स्क्रीनच्या या मिनी आयपॅडमध्ये आयपॅडची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. भारतीय रुपयांनुसार १७ हजार रुपयांच्या आसपास याचे मूल्य असेल, अशी चर्चा आहे. एप्रिल २०१० मध्ये आयपॅड बाजारात आणला होता. बाजारात जबरदस्त यशस्वी झालेल्या या ऑयपॅडची आतापर्यंत ८.४ कोटी युनिट्स एवढी विक्री झाली आहे. हा आयपॅड आकाराने निम्मा असण्याची शक्यता आहे. सॅमसंग, किंडल फायर आणि गुगल नेक्स त्याचे स्पर्धक असतील.

आयपॅड मिनीचा स्क्रीन-डिस्ल्पे काळ्या आणि पांढ-या रंगाचे मॉडेल (ब्लॅक अँड व्हाईट), ७.९ इंचाची स्क्री न, १०२४x७६८ पिक्सील डिस्ले , ४जी कन्वर्टिबल. तर आकार ७.२ मिमी जाडी, आयपॅडपेक्षा २३ टक्के कमी जाडीचा, ३०८ ग्रॅम वजन, आयपॅडपेक्षा ५३ टक्के हलका असणार आहे.
अॅप्स, २.७५ लाख अॅप्लिकेशन, फोटोंना एडिटिंग आणि शेअरिंग करणे सोपे, १०८० पिक्सेल एचडी रेकॉर्डिंग करण्यावची क्षमता असणार आहे. डयुएल कोअर ए ५ चिपमुळे एकाचवेळी अनेक कामे करण्या८ची सुविधा, १० तासांचा बॅटरी बॅकअप असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.