मोबाईल `टीचर`च्या भूमिकेत, देणार शिक्षणाचे धडे

काही मुस्लीम देशांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तर तालिबानने महिलांनी शिक्षण घेवू नये म्हणून फतवा काढला आहे. मात्र, अफगाणिस्तानने नामी युक्ती शोधून काढली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी मोबाईलचा वापर केला आहे. आता मोबाईल टीचर असणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 13, 2012, 03:25 PM IST

www.24taas.com,काबूल
काही मुस्लीम देशांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तर तालिबानने महिलांनी शिक्षण घेवू नये म्हणून फतवा काढला आहे. मात्र, अफगाणिस्तानने नामी युक्ती शोधून काढली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी मोबाईलचा वापर केला आहे. आता मोबाईल टीचर असणार आहेत.
अशिक्षित लोकांना शिकवण्यासाठी अफगाणिस्तानने मोबाईलचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. मोबाईल आणि बनविलेल्या खास सॉफ्टवेअरच्या मदतीने अफगान सरकारने प्रत्येकाच्या घरी शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे.
‘मोबाईल टीचर’ असे नव्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे नाव आहे. या सॉफ्टवेअरमुळे अफगाणिस्तानमधील महिलांना साक्षर करण्यासाठी चांगली मदत होत आहे. अफगाणिस्तानमध्ये मुलींना शाळेत पाठविण्यात येत नसल्याने अफगान सरकारने नामी युक्ती शोधली आहे. या देशात केवळ १० टक्केच महिला साक्षर आहेत.

ज्या महिलांना शिक्षणाची आवड आहे. त्या महिलांना अशा मोबाईल टीचरची मद्दत मिळणार आहे. मोबाईलवरून शिक्षण घेण्याबाबत सरकार जनजागृती करीत आहे.