जोडप्याची कहाणी... राँग नंबर ते हनीमून...

नऊ वर्षापूर्वी एका व्यक्तीने कुठेतरी फोन केला होता. चुकून त्याचा नंबर दुसरीकडे लागला आणि दुसरीकडून एका महिलेने फोन उचलला.

Updated: Dec 13, 2012, 01:00 PM IST

www.24taas.com, नॉरफॉक
नऊ वर्षापूर्वी एका व्यक्तीने कुठेतरी फोन केला होता. चुकून त्याचा नंबर दुसरीकडे लागला आणि दुसरीकडून एका महिलेने फोन उचलला. आणि आपल्या रसरशीत आणि मधाळ आवाजाने त्याच्यावर जणूकाही मोहिनीच घातली. आणि या चुकून लागलेल्या फोनमुळे त्या दोघांमधील संभाषण चांगलचं वाढलं. हळूहळू दोघं इतके जवळ आले की, दोघांनी एक दुसऱ्यांची आयुष्यभर सोबत करण्याचं वचनही दिलं आणि लग्न केलं देखील.

ही काही काल्पनिक कहाणी नाहीये. तर ब्रिटनमधील नॉरफॉकच्या सेंट पीटर्स चर्चमधील एलिजाबेथ बेनेट आणि ब्रायन वुडवर्डने लग्न केल्यानंतर या रहस्यमय कहाणीचा उलगडा केला. लग्नानंतर एलिजाबेथने सांगितलं की, जेव्हा फोनवर ब्रायनशी पहिल्यांदा बोलणं झालं तेव्हा तिला तो फारच आखडू वाटला होता.
मात्र त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून त्याच्या वागण्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर काही आठवड्यानंतर थेटफोर्ड रेल्वे स्टेशनवर त्यांची भेट झाली आणि त्यानंतर मात्र आम्ही दोघं कधीच एकमेकांपासून दूर राहु शकलो नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मलाही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून... मात्र त्यानंतर जे काही झालं त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये...
ती म्हणते की, ब्रायनने चार वर्षापूर्वी माझ्या २१ व्या वाढदिवसाच्या ठिक एका दिवसानंतर माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. बेनेट म्हणते की, आमचं लग्न फारच छान झालं आणि तेव्हा वातावरणही अगदी रोमाँण्टीक होतं. लग्नात बेनेटच्या चार मैत्रिणी होत्या त्यातील हैना हैमिल्टनचं म्हणणं आहे की, त्यादिवशी दोघंही फारच खूश होते. प्रेमाने त्यांना आभाळ ठेगणं झाल्यासारखं वाटत होतं. नॉरफॉकच्या मुंडफोर्ड शहरात राहणाऱ्या बेनेट आणि वुडवर्ड नव्या वर्षी हनीमूनला जाण्याच्या तयारी करीत आहेत.