www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहावीच्या पुस्तकातली भू`गोल`माल
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशामध्ये मोठाच गोंधळ केला आहे. अरुणाचल प्रदेश चक्क चीनचा भाग असल्याचं दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे. भारताच्या नकाशाबाबत केलेल्या गोंधळाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतलीय. ही गंभीर चूक असल्याचं सांगत याप्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
हे पुस्तक मागे घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. ज्या समितीनं हे पुस्तक मान्य केलं ती समिती बसखास्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलीय. दहावीच्य़ा भूगोलाच्या पुस्तकात अरूणाचल प्रदेशचा संपूर्ण भूभाग चीनमध्ये दाखवण्यात आलाय. अरुणाचल प्रदेशावर चीनने अनेकवेळा आपला अधिकार असल्याचा दावा केला. पण भारताने चीनला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र राज्य शिक्षण मंडळाने पुस्तकात चुकीचा नकाशा छापला आहे. या नकाशावरून अरुणाचल प्रदेश चीनमध्ये असल्याचं विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विचार न करता पदव्युत्तर स्तरावर अभ्यासला जाणारा भूगोलाविषयीचा गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असा प्रादेशिक दृष्टीकोनही दहावीच्या विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आलाय. हे पुस्तक अखेर मागे घेण्यात येत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.