www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
तुम्ही जर विंडोज XPवर काम करत असाल, तर तुम्हाला मंगळवारपासून (८ एप्रिल) ओएस `विंडोज XP`ची सेवा मिळणार नाहीय.
कारण सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट त्याच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमला (ओएस) चालना देण्यासाठी विंडोज एक्सपी बंद करणार आहे. तसंच एक्सपी ग्राहकांना एक्सपी अपडेट, हॉटफिक्स मोफत किंवा शुल्कासहित मदतीचा पर्याय आणि तांत्रिक अपडेटसुद्धा मिळणं बंद होईल.
ऑक्टोबर २००१, मध्ये विंडोज XP लॉन्च झालाय. विंडोज XP वापरण्यास सोपा असल्यानं जगात लोकप्रिय ठरला. मात्र ८ एप्रिलनंतर `विंडोज एक्सपी सेवा पॅक ३’च्या ग्राहकांना अपडेट मिळणार नाही. त्यामुळं हँकिंगचा धोका वाढणार आहे असं, मायक्रोसॉफ्टचे संचालक टिम रेन्स यांनी ब्लॉगवरून पोस्ट केलंय.
`विंडोज एक्सपी सेवा पॅक ३` बंद झाल्यानं बँकींग सेवावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. बँक असोसिएशनच्या मते, काही जुन्या एटीएमवरही यांचा परिणाम होईल. नवीन एटीएम विंडोज एक्सपीवर चालत नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.