मायक्रोमॅक्सचा `एलान्जा कॅनवॉस ए-९३` लॉन्च

मायक्रोमॅक्सने नुकताच कॅनवॉस सीरिजमधला आपला आणखी एक स्मार्टफोन ग्राहकांसमोर सादर केलाय. एलान्जा कॅनवॉस ए-९३ हा स्मार्टफोन आता तुम्हाला ऑनलाईन स्टोअर्सवर पाहायला मिळू शकतो.

Updated: Feb 11, 2014, 09:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोमॅक्सने नुकताच कॅनवॉस सीरिजमधला आपला आणखी एक स्मार्टफोन ग्राहकांसमोर सादर केलाय. एलान्जा कॅनवॉस ए-९३ हा स्मार्टफोन आता तुम्हाला ऑनलाईन स्टोअर्सवर पाहायला मिळू शकतो.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच, नवा कोरा लॅपॉटॉप लॉन्च करून मायक्रोमॅक्स बाजारात दिमाखात उभी राहिली होती. २०१४ या वर्षात काहीतरी मोठं करण्याचा कंपनीचा विचार आहे.
`एलान्जा कॅनवॉस ए-९३` हा ड्युअल सीम सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे... यात अॅन्ड्रॉईड ४.२ जेलीबीन ही ऑपरेटींग सिस्टीम वापरण्यात आलीय. या स्मार्टफोनला पाच इंचाचा स्क्रिन असून एक जीबी रॅम आहे. तसंच या स्मार्टफोनला५४० X ९६० पिक्सल रिझोल्युशनचा डिस्प्ले आहे. १.३ गिगाहर्टझचा डयुएल कोअर प्रोसेसर देण्यात आलाय. `एलान्जा कॅनवॉस ए-९३`मध्ये ४ जीबीची इनबिल्ट मेमरी आहे. मेमरी कार्डच्या मदतीने मेमरी वाढविता येऊ शकते. ५ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा देण्यात आला असून ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टीव्हीटीसाठी `एलान्जा`मध्ये थ्रीजी, वायफाय, मायक्रो यूएसबी आणि ब्लुटूथ असे फिचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये १९५० एमएएचची बॅटरी आहे. `एलान्जा कॅनवॉस ए-९३` काळ्या आणि निळ्या रंगात उपल्बध आहेत.
`एलान्जा कॅनवॉस ए-९३`साठी ग्राहकांना ९४०० रुपये ग्राहकांना मोजावे लागतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.