www.24taas.com, न्यूयॉर्क
नासाचं ‘क्युरियोसिटी’ रोवर मंगळावरील जीवसृष्टीचे अवशेष दाखवून देईलअसा दावा अमेरकन शास्त्रज्ञांनी केला आहे. ३० वर्षांपूर्वीच हे अवशेष आढळले होते. मात्र यावर क्युरियोसिटी शिक्कामोर्तब करेल.
गिलबर्ट लेविन यांच्या अध्यक्षतेखाली १९७६ साली गेलेल्या नासाच्या व्हायकिंग मिशन हे पुरावे शोधले होते. हे मॉसन मंगळ ग्रहावर केलं गेलं होतं. त्यवेळी या ग्रहावर जीनसृष्टीचे अवशेष मिळाल्याचा दावा केला गेला होता. मात्र याच्या निश्चितीबाबत संभ्रम होता.
लेविन यांना आशा आहे की क्युरियोलिटी आपल्या दाव्यांना पुष्टी देणारे पुरावे नक्की घेऊन येईल. यातून मिळालेल्या नव्या पुराव्यामुळे लेविन यांच्या दाव्य़ात तथ्य असल्याचं नक्की होईल. मंगळावर कार्बनवर आधारित अणूच नसल्याने तेथे जीवसृष्टी असूच शकत नाही, असा दावा शास्त्रज्ञांचा होता. मात्र, लेविन यांचा दावा खरा ठरू शकतो. कारण तेव्हा जीवसृष्टीचे अवशेष मिळाल्याचा दावा लेविन यांनी केला होता.