व्यक्त करा आपल्या भावना... SMSद्वारे!

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

Updated: Aug 5, 2012, 07:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

 

 

 

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!

हा धागा नीट नपायचा असतो,

तो कधीच विसरायचा नसतो!

कारण ही नाती तुटत नाहीत

ती आपोआप मिटून जातात

जशी बोटावर रंग ठेवून

फुलपाखरं हातून निसटून जातात!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

रोजच आठवण यावी, असे काही नाही

रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही।

मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात...

आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात!

 

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..

भुरकन उडून जातात..

नंतर उरतात ती आठवणीची पिसे…

काही मऊ, काही खरखरीत…

काही काळी, काही पांढरी…

जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची…

त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी…

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,

प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,

जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,

सोबत फक्त मैञीचा आधार असावा!

मैञी म्हणजे एक आधार,

एक विश्वास, एक शांती,

एक सुखद सहवास,

एक निस्वार दुःख व्यक्त करण्याची जागा,

एक उत्साह, भेटल्यावर चेहऱ्या उमटणार हास्य,

मदतीचा पहिला हात आणि जीवनभर असणारी साथ...

 

 

एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे..

समोरच्याच्या डोळयातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे...

मान अपमान मैत्रीत काहिच नसतं...

आपलं हृदय फक्त समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे...

 

 

निसर्गाला रंग हवा असतो

फुलाला गंध हवा असतो,

व्यक्ती ही एकटी कशी राहणार,

तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो!

 

 

Friendship is not a game to play,