www.24taas.com,
लिनेव्हो कंपनी कॉमप्युटर, लॅपटॉप आणि टॅबलेट क्षेत्रात प्रसिद्ध आहे. लिनोव्हो ही मूळ चायनिज कंपनी असून तिची मुख्यालयं हाँगकाँग आणि अमेरिकेत आहेत. ही कंपनी आता मोबाइल क्षेत्रातही उतरली असून लवकरच लिनेव्होचा आपला पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात आणणार आहे. चीनमधली ही दोन नंबरची मोबाइल कंपनी आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारही पादाक्रांत करण्यासाठी लिनेव्हो उतरत आहे.
मोबाइल क्षेत्रात लिनेव्होला अनेक मोठ्या कंपन्यांशी सामना करावा लागणार आहे. नोकिया, सॅमसंग, मोटोरोला, एलजी, ब्लॅकबेरी यांची भारतीय बाजारांमध्ये चलती आहे. लिनेव्हो थेट स्मार्टफोनच लाँच करत आहे. यात अँड्रॉइड सिस्टम असेल. चीनमध्ये काही दिवसांपूर्वीच लिनेव्होने A660 हा स्मार्टफोन लाँच केला होता. याला चायनीज मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लिनेव्हेच्या A660 या स्मार्टफोनमध्ये ४ इंचाची TFT टचस्क्रीन असेल याचं रिझोल्यूशन 400x320 इतकं आहे. तसंच ४.० हे अँड्रॉइड सॉफ्टवेअर असेल. या मोबाइलमध्ये ड्युएल सिमची सोय आहे. कॅमेरा ५ मेगापिक्सेल इका आहे आणि स्क्रीनच्या बाजूला व्हीजीए कॅमेरा आहे. या फोनमध्ये 1GHZ नोव्हा थोर U8500 ड्युएल कोरटॅक्स A9 प्रोसेसर आहे. याशिवाय या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वॉटरप्रूफ आहे. हा फोन अर्धा तास १ लीटर पाण्यात राहू शकतो.