फेसबुक की `फेक`बुक?

फेसबुक या सोशल वेबसाईटनं नुकतंच वयाच्या नवव्या वर्षात पदार्पण केलंय. जगभरात १ अब्ज फेसबुक युजर्स असल्याचं सांगण्यात येतं पण खरी गोष्ट म्हणजे यातील जवळजवळ साडेसात कोटी युजर्स हे बोगस आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 5, 2013, 08:10 AM IST

www.24taas.com, मुंबई
फेसबुक या सोशल वेबसाईटनं नुकतंच वयाच्या नवव्या वर्षात पदार्पण केलंय. जगभरात १ अब्ज फेसबुक युजर्स असल्याचं सांगण्यात येतं पण खरी गोष्ट म्हणजे यातील जवळजवळ साडेसात कोटी युजर्स हे बोगस आहेत.
फेक प्रोफाईल आणि स्पॅम युजर्सना रोखण्यासाठी फेसबुकनं आपले वर्चस्व पणाला लावलं मात्र म्हणावं तितकं यश अजून तरी फेसबूकला मिळालेलं नाही. उलट दिवसेंदिवस फेसबुकवर फेक प्रोफाईल वाढताना दिसतायत. ०.९ टक्के युजर्सनी फेसबूक वापरणंच सोडून दिलंय तर ५ कोटी ३० लाख युजर्सचे फेसबूकवर डुल्पिकेट प्रोफाईल अस्तित्वात आहेत. तर तब्बल १ कोटी ३८ लाख युजर्सच्या चुकीच्या माहितीसह फेसबूक प्रोफाईल आहेत.
जून २०१२ मध्ये आलेल्या अहवालानुसार, १ कोटी ५१ लाख इतके स्पॅम युजर्स फेसबूकचा वापर करत होते. तर याच अहवालनुसार १ कोटी ८० लाख युजर्स दररोज फेसबूकचा वापर करत होते. यामध्ये वर्षानुरुप सरासरी २८ टक्के भर पडत आहे. जवळजवळ ६८ कोटी युर्जस मोबाईलवर फेसबूक वापरतात. त्यामध्ये एका वर्षात तब्बल ५७ टक्के वाढ होत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय.

सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग म्हणून फेसबुक ओळखलं जातं. मार्क झुकेरबर्ग आणि त्याच्या चार मित्रांनी २००४ मध्ये फेसबुकची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली होती... पण, आता या स्पॅम आणि बोगस युजर्सना रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.