फेसबुकवर `स्टेटस अपलेडिंग`मध्ये भारत पुढे

वैयक्तिक आयुष्यातील किंवा सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घटना फेसबुकवर टाकण्याचा ट्रेंड भारतात येऊन बरीच वर्षं झाली असलं, तरी अजूनही त्याचं आकर्षण कमी झालेलं नाही. फेसबुक शेअरिंग तसंच ट्विटरवरील पोस्टिंग यामध्ये भारतीयांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 4, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वैयक्तिक आयुष्यातील किंवा सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घटना फेसबुकवर टाकण्याचा ट्रेंड भारतात येऊन बरीच वर्षं झाली असलं, तरी अजूनही त्याचं आकर्षण कमी झालेलं नाही. फेसबुक शेअरिंग तसंच ट्विटरवरील पोस्टिंग यामध्ये भारतीयांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
इंटरनेट आणि कंप्युटर ट्रेणड या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. खासगी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट फेसबुकवर शेअर करण्यात भारतीय सर्वाधिक वेळ घालवत असतात. सौदी अरेबियाला मागे टाकत भारताने यामध्ये पहिला नंबर पटकावला आहे.
स्मार्टफोनचा वाढता वापर, टॅब्लेट्सचा वापर, इंटरनेट युजर्सची वाढती संख्या यामुळे सोशल नेटवर्किंग सहज आणि सुलभ होऊन गेले आहे. यामुळे अनेक भारतीय फेसबुकवर आपल्या आयुष्यातील घटना शेअर करत असतात. आपले विचार मांडण्यासाठी फेसबुकचा वापर अधिकाधिक केला जात आहे. स्टेटस अपडेट, फोटो, व्हिडिओ आणि लिंक्स शेअर करणे यासाठी भारतीय सतत फेसबुकचा वापर करत असतात.
स्मार्टफोन युजर दिवसभरात सरासरी १५० वेळा आपला फोन चेक करत असतो. किमान २३ वेळा तो मॅसेज अपडेट पाहात असतो. गेल्या चार वर्षांत ८८ लाखांहूनही जास्त स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. त्यामुळे फेसबुक तसंच ट्विटरची लोकप्रियता वाढली आहे. यामुळेच फेसबुकचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.